Download Screen Reader (NVDA)

About Us


 

25 ऑक्टोबर 2011 रोजी चंद्रपूर महानगरपालिकेची स्थापना करण्यात आली आहे. हे शहर स्वच्छ आणि भव्य बनवणे आणि नागरिकांना सर्व सुविधा उपलब्ध करून देणे" ही चंद्रपूर महानगरपालिकेची प्रमुख इच्छा आहे.

इतिहास 

चंद्रपूर, पूर्वी चंदा म्हणून ओळखले जात होते, याचा इतिहास 13व्या शतकात गोंड राजांनी स्थापनेपासून सुरू होतो. गोंड राजा खंडक्या बल्लाळ साह यांनी चंद्रपूर शहराची स्थापना केलीमजबूत चंद्रपूर किल्ला बांधला. सांगितले जाते की झरपट नदीच्या पवित्र जलामुळे राजाचा आजार बरा झाला आणि त्याने या ठिकाणी शहर वसवले. 

चंद्रपूरवर गोंड राजे, त्यानंतर मराठे आणि नंतर ब्रिटिश राजवट होती. त्यामुळे इथली संस्कृती विविध परंपरांचा संगम आहे. 

चंद्रपूर जिल्ह्यात चंद्रपूर, बल्लारपूर, राजुरा, भद्रावती, वरोरा, चिमूर, नागभीड, ब्रम्हपुरी, सिंदेवाही, मूल, सावली, गोंडपिपरी, कोरपना, पोंभुर्णा आणि जिवती या १५ तालुक्यांचा समावेश आहे.

द्रपूरची वैशिष्ट्ये 

1. ऊर्जाउद्योग 

  • "ब्लॅक गोल्डचे शहर" म्हणून ओळखप्रचंड कोळसा साठा. 

  • महाजेनको थर्मल पॉवर स्टेशनराज्यातील सर्वात मोठ्या उर्जा प्रकल्पांपैकी एक. 

  • प्रमुख उद्योग: कोळसा खाण, सिमेंट, कागद, विद्युत निर्मिती. 

2. जैवविविधतानिसर्ग 

  • ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे प्रवेशद्वारभारतातील सर्वोत्तम व्याघ्र प्रकल्पांपैकी एक. 

  • समृद्ध वनसंपत्तीइको-पर्यटनाची संधी. 

3. धार्मिकसांस्कृतिक वारसा 

  • अंचलेश्वर मंदिर, महालक्ष्मी मंदीर, भद्रावती जैन मंदिरे, विठ्ठल मंदीर ही धार्मिक स्थळे. 

  • चंद्रपूर किल्लाअंचलेश्वर गेट, पठाणपूरा गेट ही ऐतिहासिक स्थळे. 

4. शैक्षणिकनागरी विकास 

  • शैक्षणिकदृष्ट्या विकसित होत असलेले शहरशाळा, महाविद्यालयेप्रशिक्षण संस्था. 

  • चंद्रपूर महानगरपालिकाइतर संस्था नागरी सुविधांच्या विकासात सक्रिय.